विद्यार्थ्यांच्या स्वागतापूर्वी आडुळमध्ये सामूहिक स्वच्छता अभियान

Foto
पैठण, (प्रतिनिधी) जिल्हास्तरीय सामूहिक श्रमदान स्वच्छता अभियानाची सुरुवात पैठण तालुक्यातील पीएम श्री जिल्हा परिषद प्रशाला अडुळ येथून शनिवारी उत्साहात 
करण्यात आली. 
जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर शाळा व गाव परिसर स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त करण्यासाठी ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी तसेच विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांनी श्रमदान केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती मादनकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला. शिक्षण समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने शाळा परिसरासह सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. विद्याथ्यांनाही स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत त्यांचा सहभाग नोंदविण्यात आला.
यावेळी सरपंच बबन भावले, उपसरपंच भाऊसाहेब पिवळ, माजी सरपंच विजय वाघ, माजी उपसरपंच जाहीर शेख, उद्धव भावले, हरून पठाण, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, वैद्यकीय कर्मचारी, ग्रामस्थ तसेच शाळेतील शिक्षकवृंद उपस्थित होते. 

मुख्याध्यापिका ज्योती मादनकर यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या अभियानामुळे गावात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण झाली असून स्वच्छ गाव, सुंदर शाळाफ हा संदेश प्रभावीपणे पोहोचला.